
जिल्ह्यातील देवीमंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण
बातमी थोडक्यात
जिल्ह्यातील देवीमंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून रविवारी श्रीक्षेत्र मोहटदेवी गडावर घटस्थापना होणार आहे. माहूरहून ४०० किमीवरून आणण्यात आलेली ज्योती रविवारी दुपारपर्यंत श्रीक्षेत्र अमरापूर येथे दाखल होईल, तर भविणीमगाव येथे हरिनामसप्ताह व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.