
पुण्यातील एका अभियंत्याचा इलेक्ट्रिक हीटिंग बॅगच्या शॉकने मृत्यू
बातमी थोडक्यात
वडगाव शेरी येथील एका भाड्याच्या घरात हीटिंग बॅगच्या शॉकने ३० वर्षीय कॉम्प्युटर इंजिनियर रोहन कुबाडी यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर शेजाऱ्यांनी दुर्गंधीमुळे घरमालकाला याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चंदननगर पोलिसांनी त्यांना बेडवर जळालेल्या हीटिंग बॅगसह मृत अवस्थेत पाहिलं. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल.