
तुळजाभवानी मंदिरात नवरात्र उत्सव सुरू
बातमी थोडक्यात
श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी सुरुवात होत असून शनिवारी दीड लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवासह यात्रेसाठी नगरपरिषद आणि पोलिसांनी तयारी केली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत.