
पिंपळेतील शेतकऱ्यांनी कॅपेसिटर बसवून वीजपुरवठ्यातील समस्या सोडवली
बातमी थोडक्यात
दिंडोरी ग्रामीण विभागातील पिंपळे येथील शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांच्या आवाहनानंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पंपांमध्ये कॅपेसिटर बसविले. यामुळे वीजपुरवठा अखंडित राहिला व ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण कमी झाले. या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.