
आयसीजीएस अजित गोव्यात कार्यान्वित
बातमी थोडक्यात
भारतीय तटरक्षक दलाने वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे नवीन गस्ती नौका 'आयसीजीएस अजित' कार्यान्वित केली. डॉ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते नौकेला कार्यान्वित करण्यात आले. यावेळी उपमहानिरीक्षक मनोज भाटिया व इतर अधिकारी उपस्थित होते. स्थानिक पातळीवर डिझाइन व बांधण्यात आलेल्या या नौकेमुळे सागरी कायद्याची अंमलबजावणी, शोध व बचाव, किनारपट्टी सुरक्षा आणि सागरी पर्यावरण संरक्षण यांस मदत होणार आहे. आयसीजीएस अजित भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील होऊन सागरी सुरक्षा आणि संरक्षण क्षमता वाढवेल.