नांदेड : २२२ गुन्हे दाखल, अवैध धंदेच्या कारवाईत ३ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
बातमी थोडक्यात
नांदेड परिक्षेत्रात अवैध धंदे निर्मूलन अभियान-४ अंतर्गत २२२ गुन्हे दाखल होऊन ३ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या देखरेखीखाली नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या परिक्षेत्रातील अवैध धंदे निर्मूलनासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. गुटखा, जुगार, मटका यांवर केलेल्या कारवाईत यापूर्वीच मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.