
इंद्रगढी देवी संस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण
बातमी थोडक्यात
इंद्रगढी देवी संस्थानच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून रविवारपासून घटस्थापनेसह नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या उत्सवात दहा दिवस २० हजार भाविकांचे दर्शनासाठी स्वागत करण्यात येणार असून मंदिरामध्ये स्वच्छता, नूतनीकरण व विद्युत प्रकाश योजना करण्यात येणार आहे. मंगळवार २० ऑक्टोबर रोजी दसरा व सिमोलंगन समारंभासह नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.