
मराठवाड्यातील दुष्काळात डॉ. गोऱ्हे यांचे चारा पुरवठ्याचे आदेश
बातमी थोडक्यात
उदगीर तालुक्यातील करडखळ, दिगराज येथील दुष्काळग्रस्त गावांतील पाणी व चारा टंचाईच्या समस्येवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चर्चा केली. दोन हजारांहून अधिक जनावरांना तातडीने चारा पुरवठ्याची गरज असून अधिकाऱ्यांना जनावरांची यादी तयार करून पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले. सोमवारपासून गावांना चारा पुरवठा होणार आहे.