
द्वारका दत्ता मंदिर रोड रुंदीकरणास मंजुरी
बातमी थोडक्यात
द्वारका ते दत्ता मंदिर रोड रस्त्याच्या रुंदीकरणास मंजुरी, व्ही. पी. सेठी यांच्या कंपनीने सर्वात कमी बोली लावल्याने नाशिक महापालिकेचे ८४ कोटी रुपये वाचले. ५. ६५० किलोमीटरचा हा रस्ता दहा पदरी ४५ मीटरचा होणार असून द्वारका ते नाशिक रोड दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होणार आहे. महापालिकेच्या दाव्यानुसार ९० टक्के जमीन अधिग्रहित झाली आहे.