
मुंबई आणि कोकणात 12 ऑक्टोबर पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा
बातमी थोडक्यात
दक्षिण कोकणातील तुरळक भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती, हवामान खात्याकडून 12 ऑक्टोबर पर्यंत इशारा मुंबई महानगर प्रदेश आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये नागरिक उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करू शकतात, काही भागात तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढू शकते. अंतर्गत महाराष्ट्रात 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.