
सातारा रुग्णालयात आधुनिक एमआरआय सुविधा सुरू
बातमी थोडक्यात
शिवेंद्रसिंह राजे यांच्या पाठपुराव्यामुळे सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सामान्य रुग्णालयात आधुनिक एमआरआय सुविधेचा प्रारंभ झाला आहे. सातारा जिल्ह्यातील रुग्णांना आता अत्याधुनिक निदान सुविधा आणि जिल्हांतर्गत त्वरित उपचार उपलब्ध होणार आहेत. गरजू रुग्णांना सीटी स्कॅन, एमआरआय, केमोथेरपी या उपचार सुविधांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे.