
जलसंधारणातून दाईठाणे गुंजलाशी नाना पाटेकरांचा जिव्हाळा
बातमी थोडक्यात
1991 साली 'सूर्योदया'च्या निमित्ताने नाना पाटेकरांची दाईठाणे गुंजलाशी झालेली ओळख कायमस्वरूपी ठरली. सात ते आठ किलोमीटर लांबीच्या नदीपात्राला खोली देऊन जलसंधारणाचे प्रयत्न, शेती सुधारणे, गावातील सोयीसुविधा वाढवणे यातून नाना पाटेकर आणि गावकरी यांच्यातील बंध अधिक दृढ झाला.