
बुलढाण्यात निसर्गोपचार तज्ज्ञ नीलम देशमुख यांचा गौरव
बातमी थोडक्यात
उमब्रज येथील निसर्गोपचार तज्ज्ञ नीलम देशमुख यांना निसर्गोपचार गौरव सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. अनेक तज्ज्ञांच्या उपस्थितीत भ्रातृमंडळ सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व इतर संस्थांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.