
कर्करोगाच्या औषधांच्या मार्जिनवर ३० टक्के मर्यादा घालणार सरकार
बातमी थोडक्यात
कर्करोगाच्या महागड्या औषधांच्या व्यापार मार्जिनवर मर्यादा घालण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरू आहे. यामुळे निवडक औषधांच्या कमाल किरकोळ किंमतीत ७० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. या निर्णयामुळे रुग्णांचा खिशाला होणारा फटका कमी होणार असून, नवीन प्रणालीत समाविष्ट करण्यासाठी औषधांची यादी समिती तयार करणार आहे. प्रस्तावित प्रणाली सुमारे १० दिवसांत लागू होण्याची शक्यता आहे.