
लोंढे नाल्याजवळ वाहतूक अडथळा बसवल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले
बातमी थोडक्यात
नागपूर-सुरत महामार्गावर लोंढे नाल्याजवळ दोन ग्रामस्थांना अपघात झाल्याने नागरिक रस्त्यावर उतरले. आमदार राम भदाणे यांनी मध्यस्थी करून वाहतूक अडथळा बसवण्याचे आदेश दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.