
कोंढवा शाळेतील गटार समस्या: अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका
बातमी थोडक्यात
कोंढवा येथील संत गाडगे महाराज शाळेतील सांडपाणी वाहून जाणाऱ्या गटारातील सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच डासांची पैदास होत आहे. शाळेतील शिपायाची गैरहजेरी असल्यामुळे प्रशासनाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप पालकांनी केला आहे. तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.