
मुंबई पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करणारे अजय बारस्कर
बातमी थोडक्यात
मनोज जरांगे पाटील हे आयटीआय पास असलेले काळ्या यादीत असलेले कंत्राटदार असून त्यांना १४ कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली असा आरोप अजय बारस्कर यांनी केला. जरांगे यांचा अदृश्य हात असलेला संजय कटारे याने २०२३ मध्ये ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची वाळू चोरली. आरक्षण आंदोलनाद्वारे मराठा समाजाला धोका दिल्याचा आरोप करत मराठा समाजाचा जरांगे यांच्या नेतृत्वावरील विश्वास उडत चालला आहे.