
गोवा मद्य नवलेत जप्त
बातमी थोडक्यात
नवले येथील पुलावरून अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत 750 मिलीच्या 300 बाटल्या, 180 मिलीच्या 2 हजार 640 बाटल्यांसह एकूण 16 लाख 49 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. कारवाईत ह्युंदाई क्रेटा कारही जप्त करण्यात आली.