
गोकुळ निवडणूक पॅनल आज जाहीर
बातमी थोडक्यात
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळ आज राजर्षी छत्रपती शाहू समविचारी आघाडी पॅनल निवडणुकीसाठी जाहीर करणार आहे. आमदार सतेज पाटील यांची पॅनल तयार असून, ते सायंकाळी पाचच्या सुमारास उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. 'गोकुळ'साठी महायुती आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.