
स्टोव्ह दुरुस्तीच्या नावाखाली लाखोची फसवणूक
बातमी थोडक्यात
एका निवृत्त प्राध्यापिका अंजू नितीन साडीकर यांच्या मोबाईल आणि गुगल पे खात्यात एका सायबर चोराने अधिकारी असल्याचे सांगून हॅक करून ९९ हजार ५ रुपयांची फसवणूक केली. स्टोव्ह दुरुस्तीसाठी त्यांनी गुगल ग्राहक सेवेशी संपर्क साधला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, निरीक्षक भालेराव पुढील तपास करत आहेत.