चिंचवड सभागृहात दोन नाटकांचा आनंद
बातमी थोडक्यात
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात सादर झालेल्या 'ऑल द बेस्ट' आणि 'वरवरचे वधू-वर' या दोन नाटकांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'ऑल द बेस्ट' हे नाटक देवेंद्र पेम यांनी लिहिले असून ते मयुरेश पेम, मनमीत पेम आणि निखिल चव्हाण यांनी सादर केले. 'वरवरचे वधू-वर' हे नाटक विराज कुलकर्णी यांनी लिहिले असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. सुव्रत जोशी, सखी गोखले आणि सूरज परासनीस यांनी हे नाटक सादर केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबर या काळात 'शास्त्रीय मराठी भाषा सप्ताह' साजरा केला जात आहे.