
उमरखेड-पुसद रस्त्यावर दुचाकी अपघातात शिक्षिकेचा मृत्यू
बातमी थोडक्यात
उमरखेड-पुसद रस्त्यावर कुपाटी येथील दादाराव मोरे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिकवणाऱ्या प्रज्ञा गजानन चव्हाण या शिक्षिकेला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर कुपाटी परिसरात शोककळा पसरली आहे. पोफळी पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.