
ग्रामीण पशुसंवर्धन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
बातमी थोडक्यात
मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन उद्योजकता योजनेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला लवकरच महा-डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे. नागरिकांनी योजनेचा भाग असल्याचे सांगणाऱ्या अनधिकृत संस्थांना वैयक्तिक कागदपत्रे सादर करू नयेत किंवा पैसे देऊ नयेत, असा इशारा दिला आहे. योजनेसाठी कागदपत्रे गोळा करण्यासाठी कोणत्याही अशासकीय संस्थेला अधिकृतता नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.