
श्री चतुश्रृंगी देवी मंदिरात नवरात्र उत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
बातमी थोडक्यात
श्री चतुश्रृंगी देवी मंदिरात ११ ते २० ऑक्टोबर या काळात नवरात्र उत्सव होणार असून, या उत्सवात घटस्थापना, महापूजा व नवचंडी होम होणार आहे. देवीच्या पालखीची यात्रा दसऱ्याला होणार असून, या वेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या संपूर्ण उत्सवात मंदिर दर्शनासाठी खुले राहील.