
हॉटेल साईराज लॉजिंगवर धाड; मालकासह तिघांना अटक
बातमी थोडक्यात
छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावरील कडेगाव येथील हॉटेल साईराज लॉजिंगमध्ये वेश्याव्यवसायाची गुप्त माहिती मिळाल्यानंतर बदनापूर पोलिसांनी धाड टाकली. या धाडमध्ये नाशिकच्या ३० वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली, तसेच १ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. लॉज मालक, व्यवस्थापक आणि ग्राहकावर वेश्यालय चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.