
मनोज जरांगे यांच्यावर ५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप, 'टेंडर वॉरियर' म्हटलं अजय बारसकर
बातमी थोडक्यात
संघर्ष योद्धा नसून मनोज जरांगे हे ५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात 'टेंडर वॉरियर' असल्याचा आरोप अजय बारसकर यांनी केला आहे. बारसकर यांनी जरांगे यांच्या टोळीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संगनमत करून ५ हजार ४२६ कोटी रुपयांचे टेंडर मिळवल्याचा दावा केला आहे. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत कागदपत्रे सादर केली आणि सर्व पुरावे ईडीकडे सोपवणार असल्याची घोषणा केली.