
प्रभातनगरमध्ये अनधिकृत चार मजली इमारत पाडली
बातमी थोडक्यात
पिंपळे गुरव येथील प्रभातनगरमध्ये अनधिकृत चार मजली आरसीसी बांधकामावर महापालिकेने 'सर्जिकल स्ट्राईक' करत ४३२ चौरस मीटर जागा बेकायदा बांधकामातून मुक्त केली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या बेकायदा व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्याच्या आदेशानंतर 'डी' विभागीय कार्यालयाच्या देखरेखीखाली पाडकाम करण्यात आले. विभागीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांनी बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना स्पष्ट संदेश देत कारवाईची योजना आखून अंमलबजावणी केली.