
पात्रता वादावरून व्यावसायिक प्रशिक्षकाची नियुक्ती रद्द
बातमी थोडक्यात
आवश्यक पात्रता पूर्ण न केल्यास केवळ परीक्षेतील गुण हे नोकरी भरतीसाठी पुरेसे नाहीत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. १०+२ची अट पूर्ण न केल्यामुळे एका उमेदवाराची व्यावसायिक प्रशिक्षक (प्राॅक्टिकल) पदावरील नियुक्ती गोवा सरकारने रद्द केली. भरतीचे नियम न्यायालयीन पुनरावलोकनाने बदलता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.