
भाजप पुणे शिक्षक-पदवीधर एमएलसी निवडणुकीसाठी मेगा कॅम्पेन सुरु
बातमी थोडक्यात
पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने मोठ्या प्रमाणात प्रचार मोहीम सुरु केली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक समिती असून अनेक मंत्र्यांना सह प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. स्मिता योगेश जाधव आणि कौस्तुभ गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून शिक्षक आणि पदवीधरांशी थेट संपर्क साधण्यासाठी भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे.