
हिंगोली आग: फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत दोन ठार, १२ जखमी
बातमी थोडक्यात
मारवाडी गल्लीतील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. विजय रामकृष्ण बसतवार आणि अविनाश काशीनाथ बांगर अशी मृतांची नावे आहेत. तीन गंभीर जखमींना उपचारासाठी लातूर आणि संभाजीनगर येथे पाठवण्यात आले आहे. आगीमुळे अंदाजे १५ लाखांचे नुकसान झाले आहे.