
चिंचोडी पाटील शाळेत मोबाईल मुक्त उपक्रम सुरू
बातमी थोडक्यात
चिंचोडी पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १६ शिक्षकांनी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत मुख्याध्यापकांकडे मोबाईल जमा करून मोबाईल मुक्त उपक्रमाला सुरुवात केली. शिक्षणाचा दर्जा सुधारणे, वाचन संस्कृतीला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शाळेतील शिस्तीचे कौतुक करत सीईओ आनंद भंडारी यांनी संगणक प्रयोगशाळेच्या उद्घाटनासाठी भेट दिली.