
खोपोली रुग्णालयात औषधामुळे नवजात मुलीचा मृत्यू
बातमी थोडक्यात
खोपोली येथील डॉ. केजरीवाल यांच्या रुग्णालयात प्रसूतीनंतर तपासणीसाठी आणलेल्या आठ दिवसांच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध दिल्यानंतर काही वेळातच नवजात मुलीच्या नाकातून रक्त येऊ लागले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे खोपोली येथील रुग्णालयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला.