
इंदापूर दुष्काळ: शेतकऱ्यांकडून पीक नुकसान भरपाईची मागणी
बातमी थोडक्यात
इंदापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित असूनही महसूल विभागाकडून अपेक्षित प्रमाणात पीक नुकसान भरपाई होत नसल्याचा कटी गावातील शेतकऱ्यांचा आरोप आहे. योग्य नुकसान भरपाई न झाल्याने शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्यास अडचणी येत आहेत. पंचनामे तातडीने न झाल्यास उपोषणाला बसण्याची शेतकऱ्यांची धमकी आहे.