
कडेठाणात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण
बातमी थोडक्यात
कडेठाणा येथील श्री महालक्ष्मी देवी नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मंदिर परिसर व मुख्य रस्ता सुरक्षेखाली ठेवण्यात आला आहे. येत्या ११ ऑक्टोबरपासून उत्सवाला सुरुवात होणार असून त्या दिवशी घटस्थापना होणार आहे. नाशिक येथील वाणी किल्ल्यावरून कडेठाणा येथील युवक त्या दिवशी पवित्र ज्योत आणणार आहेत.