
अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी २० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले
बातमी थोडक्यात
अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी वीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी एकूण ३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. या अर्जांची छाननी बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ येथे होणार आहे.