
राहाता मार्केटमध्ये कांदा ४६०० रुपये क्विंटल दराने दाखल
बातमी थोडक्यात
राहाता मार्केट समितीमध्ये मंगळवारी कांदा दाखल झाला असून, कांद्याचे दर ४६०० रुपये क्विंटल या उच्चांकावर पोचले आहेत. एकूण २७४७ पोत्या दाखल झाल्या असून, कांदा क्र. १ चा दर ३५०० ते ४६०० रुपये, तर कांदा क्र. २ चा दर २२०० ते ३४५० रुपये या दरम्यान आहे. त्याच दिवशी ड्रॅगन फ्रूट, संत्री, सीताफळ, डाळिंब या फळांचीही आवक झाली आहे.