
चोंडी पेट्रोल पंपाच्या वादातून इंडियन ऑइलच्या मॅनेजरवर ७ वार
बातमी थोडक्यात
चोंडी येथील पेट्रोल पंपावर सील लावण्यावरून झालेल्या वादातून इंडियन ऑइलचे मॅनेजर महेश शेळके यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तांत्रिक कारणांमुळे तीन महिन्यांपासून बंद असलेल्या पेट्रोल पंपावरून कंपनीचे अधिकारी आणि पांडववीर कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होता. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.