
श्री महालक्ष्मी मंदिर नवरात्र महोत्सव 2026 11 ऑक्टोबर पासून सुरू होणार
बातमी थोडक्यात
सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्र महोत्सव 11 ते 20 ऑक्टोबर 2026 या काळात होणार असून या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांच्या योगदानाला सन्मानित करण्यात येणार आहे. मुख्य विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी या महोत्सवातील उपक्रमांची माहिती दिली. यात घटस्थापनेला श्री महालक्ष्मी देवीला 2 किलो सोन्याचा मुकुट देण्यात येणार आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत महिलाच आरती करणार आहेत.