
महाडच्या भांडेकोंडमध्ये बिबट्या दिसला
बातमी थोडक्यात
महाड तालुक्यातील भांडेकोंड येथील मुख्य रस्त्यावर भरदिवसा बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्त्याच्या कडेला असलेल्या उंचवट्यावर आरामात बसलेला बिबट्या स्थानिक सागर राखडे यांनी कॅमेऱ्यात कैद केला. बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.