
मुंबईत पावसाळ्यात पूरस्थितीतील पाणी काढण्यासाठी जादा पंपांचा वापर
बातमी थोडक्यात
मुंबई महापालिकेने पावसाळ्यात पूरप्रवण भागातील पाणी काढण्यासाठी जादा पंपांवर 10 कोटी 15 लाख रुपये खर्च केले. 2024 मध्ये 46 ठिकाणी तर 2025 मध्ये 80 ठिकाणी जादा पंप बसवण्यात आले. आता 131 कोटी रुपयांच्या सुधारित करारात या जादा उपाययोजनांमुळे 8.34 टक्के वाढ करण्यात आली आहे. कुर्ला, बोरिवली आदी भागांसाठी सहाय्यक आयुक्तांनी पंपांची मागणी केली होती. सुधारित कराराच्या प्रस्तावावर आगामी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.