
फटाक्यांच्या गोदामाला आग लागल्याने हिंगोलीत दोघांचा बळी
बातमी थोडक्यात
हिंगोलीतील मारवाडी गल्लीतील फटाक्यांच्या गोदामाला अचानक आग लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जण जखमी झाले आहेत. आगीने आजूबाजूच्या चार ते पाच घरांना वेढले. त्यामुळे लोकांना बाहेर काढावे लागले. घटनेनंतर हिंगोली महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.