
सर्वोच्च न्यायालयाकडून प्रत्येक रस्त्यावर फुटपाथ, पाच शहरात पथदर्शी
बातमी थोडक्यात
सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक रस्त्यावर फुटपाथ अनिवार्य केले असून, अंमलबजावणीसाठी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. पाच शहरांमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून या निर्देशांची चाचणी केली जाणार असून, केंद्रीय नियोजन यंत्रणेची गरज न्यायमूर्ती नरसिंह यांनी अधोरेखित केली आहे. यंत्रणेच्या निवडीबाबत सॉलिसिटर जनरल अहवाल सादर करणार आहेत.