
सांगली डीसीसी बँक निवडणूक: खासदार पाटील, आमदारांसह सहा उमेदवारांवर आक्षेप
बातमी थोडक्यात
खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, सुरेश खाडे, सत्यजित देशमुख यांच्यासह सहा उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आठ तासांनंतर छाननी प्रक्रिया पूर्ण केली असून, मंगळवार, 6 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या दिग्गज नेत्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार की नामंजूर, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.