
अमरावती शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले
बातमी थोडक्यात
अमरावती शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी सोळा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी ११ उमेदवारांनी १८ उमेदवारी अर्ज सादर केले. निवडणूक आयोग बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी या अर्जांची छाननी करणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख शुक्रवार, ९ ऑक्टोबर आहे.