
डोंबिवलीत बेवारस कुत्र्याला मारहाण करून ठार केले
बातमी थोडक्यात
संगमली परिसरातील जिमखाना रोडवरील सुरेश कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये एका बेवारस कुत्र्याला निर्घृणपणे मारहाण करून ठार करण्यात आले. कुत्र्याला काठीने मारहाण करून दोरीने गळा दाबून मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी सोसायटीचे सुरक्षा रक्षक ओमकार केंद्रे, तुषार केंद्रे आणि प्रकाश यांच्या विरोधात प्राणी संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.