
पुणे : कोथरूड मधील महादेव मंदिर चौक ते नदीपात्रा दरम्यान रस्ता बंद
बातमी थोडक्यात
कोथरूड मधील महादेव मंदिर चौक ते नदीपात्रा दरम्यान वाहतूक कोंडीमुळे दररोज सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत वाहतूक बंद होती. पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकर यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आलेला हा रस्ता फक्त नदीपात्रातून येणाऱ्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.