
ताडोब्यात पारंपरिक रस्ता बंद केल्याने गावकऱ्यांचा निषेध
बातमी थोडक्यात
ताडोब्यात अचानक बंद करण्यात आलेल्या पारंपरिक रस्त्यामुळे करवातील ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून त्यांना शिवानी मार्गे १३ किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत आहे. विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांना ये-जा, इंधन आणि पैशांचा फटका बसत आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामसभा घेऊन आंदोलनाचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.