
छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेची लाट कायम
बातमी थोडक्यात
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ३६ अंशांच्या वर तापमान कायम असल्याने छत्रपती संभाजीनगरकरांना असह्य उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मान्सूनच्या विश्रांतीमुळे निर्माण झालेली उष्णतेची लाट ९ ऑक्टोबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, मराठवाड्यातही तापमान वाढण्याची शक्यता आहे.