
जळगाव : शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास बँका जबाबदार राहणार
बातमी थोडक्यात
कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास बँका जबाबदार राहणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिला. दुष्काळ परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी संरक्षण देण्यात येणार आहे. चारा टंचाई व पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी येत्या काही दिवसांत उपाययोजना करण्यात येणार आहेत.