
नाशिकमध्ये उष्णतेची लाट 35°C पर्यंत
बातमी थोडक्यात
नाशिकमध्ये ऑक्टोबरच्या उष्णतेचा तडाखा बसला असून तापमान 35°C पर्यंत पोहोचले आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून रुग्णालयांमध्ये जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. लहान मुलं आणि वृद्ध नागरिक सर्दी, ताप आणि अंगदुखीने त्रस्त आहेत.